Tuesday 3 October 2017

‘उबुंटू’ Ubuntu philosophy of Ubuntu in Marathi मराठी

उबुंटू’ Ubuntu philosophy of Ubuntu in Marathi  मराठी

‘उबुंटू’ Ubuntu ऐकलाय ना शब्द….! ऐकला असेलच आणि नसेल ऐकला! वाचला तर आता तरी लक्षात आला असेलच……. उबुंटू वाचल्यावर काही विचीत्र आणि अनोखळी वाटतो मुळात आपल्या ओळखीच्या भाषेत ऐकल्यासारखं वाटत नाही किंवा आपल्या शब्द संग्रहातही कोठे सपडत नाही असो… नाराज होऊ नका.. आपल्या बुद्धी व शब्दसंपदेवर संशय घेऊ नका कारण ‘उबुंटू’ हा मुळात आपल्या भाषेतलं शब्दच नाहीये आणि त्यामुळे आपल्याला नवीन वाटतो..

पण तुमची उत्सुकता थोडी कमी करतो उबुंटू हा शब्द आफ्रिकेतील ‘झुलू’ भाषेतील शब्द ‘उबुंटू’ या शब्दाचा अर्थ  “I am beacuse We are.”  म्हणजेच “मी आहे कारण आम्ही आहोत.” शांतीदूत नेल्सन मंडेला यांच्यामुळे जगाला  कळलेला एक सुंदर शब्द……

आता तुमचा गोंधळ थोडा फार कमी झालेला असेल पण मग या ‘उबुंटू’चा आपल्याशी काय संबध किंवा याचा अर्थ आपल्याला कसा लागू पडतो. तर हा शब्द  कसा आला त्याची एक सुंदर छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या सर्व शंका दूर होतील… आफ्रिकेतील दारिद्र्य पाचवीला पुजलेले त्यामुळे सगळ्याच मुलभूत गरजांची वाणवा  त्यात अन्नाची गरज थोडी जास्तच … त्यामुळे अन्नाचा आणि खाद्यपदार्थांचा मोह थोडा जास्तच… अशाच एका छोट्या वस्तीवरील ही गोष्ट एके दिवशी एक फळांनी भरलेली पाटी त्या वस्तीवरील मुलांच्या समोर आणली पण एक अट ठेवली कि जो कोणी पळत जाऊन सर्वप्रथम त्या पाटीतील फळ घेईल त्या पाटीतील सर्व फळे त्याची … स्पर्धा आयोजकांचा पण उत्साह वाढला होता. अन्नासाठी होणारी स्पर्धा आणि धडपड त्यांना पहायची होती…. स्पर्धामध्ये ठराविक अंतरावर पाटी ठेवली मुले जमा झाली आणि स्पर्धेला सुरवात झाली पण………….

घडले ते अनपेक्षितच अन्न मिळवण्याच्या स्पर्धेसाठी न धावता त्या सर्व मुलांनी एकमेकांचे हात धरले व ती मुले एकत्र त्या फळाच्या पाटीजवळ पोहचले व मोठ्याने ओरडले ‘उबुंटू’……. व मिळून फळे खाल्ली…. या छोट्या मुलांनी जगण्याची एक मोठी रीतच जगाला शिकवली.. ‘मी’ च्या ऐवजी ‘आम्ही’ या संकल्पनेवर या छोट्यांनी मोठा भर दिला आणि खरोखरच सध्या आपल्याला I पेक्षा We ची गरज जास्त आहे…

मानवाच्या बदलत्या संस्कृती व जीवनशैलीनुसार प्रत्येकजण ‘I’ / ‘मी’ या भोवती गुरफटला आहे . मी, माझे, हे मला, ते मला… या सगळ्याभोवती त्याचा प्रवास सुरु आहे आणि आपल्या या वागण्याचे प्रतिबिंब पाल्याबरोबरच इतरांच्या व आपल्या पुढच्या पिढीवर म्हणजेच आपल्या पाल्यावर पडत आहे पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे सार्वजन एकत्र असल्यामुळे साहजिकच घरामध्ये मी पेक्षा आम्ही महत्वाचा होता पण हळू हळू एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होत गेली आणि छोट्या त्रिकोणी, चौकोनी कुटुंबाचा उदय झाला अशा कुटुंबात मी अभिव्यक्ती वाढत गेली त्यामुळे सध्या पाल्याच्या मध्ये मी हि वृत्ती वाढत आहे

या मी मुळे ही मुले महत्वकांक्षी व आक्रमक बनतात फक्त मी आणि मलाच या त्याच्या अट्टाहासामुळे  स्वतःला व कादाचीत  दुसऱ्याला नुकसान पोहोचवता मी व्यतिरिक्त आम्ही हे त्यांना पटत नाही आणि मग त्यांच्यात न्यूनगंड व एकलकोंडेपणा वाढतो.

पालक व शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे कि आपल्या पाल्याला  व विद्यार्थ्यांना ‘मी’ तून बाहेर कडून त्याला ‘आम्ही’ बनविणे उबुंटू हा शब्द आपल्याला हेच सांगतो कि ज्यावेळू आपण मी तून बाहेर पडून आम्ही असा विचार करू त्यावेळी आपली प्रगती व समानता दोन्ही घडेल आपल्या पाल्याच्या व विद्यार्थ्यांच्या बाबतीत हि आपल्या सर्वाना एकत्र घेऊन त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. यासाठी आपणही मी पेक्षा आम्ही होऊन प्रयत्न करायला पाहिजेत पालक कुटुंब समाज शिक्षक या सर्व कड्या एकत्र येऊन ज्यावेळी एकसंघपणे काम करतील त्यावेळी पाल्याचा विकास व जडणघडण १०० % पूर्ण होईल.आपल्या बरोबर सर्वाना फायदा व्हायला पाहिजे हे ज्यावेळी आपण आत्मसात करू कोणी मागे राहणार नाहीत मी आहे कारण आम्ही आहोत हि संकल्पना प्रत्यक्षात जगण्यास ज्यावेळी सुरवात होईल  त्यावेळी  खरा मानवतावाद घडेल विद्यर्थ्यांच्या बाबतीत वर्गातील सर्व विद्यार्थी असा विचार करतील व जातील त्यावेळी वर्गातला एकही विद्यार्थी मागे राहणार नाही या गोष्टी स्वीकारल्या व आत्मसाद केल्या तर आपला समाजातही कोणी मागे राहणार नाही

उबुंटू(Ubuntu philosophy) हा छोटा शब्द जगण्याचा मोठा अर्थ शिकवितो I am  पेक्षा  We are  हे महत्वाचे हे दाखवून देतो म्हणून  आजपासून आपणही  I am  नाहीतर we are….

Written By Sandip Koli

‘उबुंटू’ Ubuntu philosophy of Ubuntu in Marathi मराठी

उबुंटू’ Ubuntu philosophy of Ubuntu in Marathi  मराठी ‘उबुंटू’ Ubuntu ऐकलाय ना शब्द….! ऐकला असेलच आणि नसेल ऐकला! वाचला तर आता तरी लक्षात ...